# 1884: "अपंगत्व नाकारता येत नाही ...!" लेखिका : उर्मिला आगरकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-10-29
Description
मानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. ..
एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले...
कानाने अजिबात ऐकू येत नसल्याने कंपनांची जाणीव हेच तिचं इंद्रिय झालं होतं कंपनांच्या जाणिवेतून सुरू झालेला तिचा प्रवास आज तिला अभियंता म्हणून स्वतःच्या पायावर उभा करता झाला. यामागे आहे, तिच्या आईची अतूट इच्छाशक्ती... !
Comments
In Channel



